ylliX - Online Advertising Network
'सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात माफी मागावी', भजनसम्राट अनुप जलोटांचा भाईजानला सल्ला

'सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात माफी मागावी', भजनसम्राट अनुप जलोटांचा भाईजानला सल्ला



मुंबई – सध्या कठीण काळातून जात आहे. भाईजानला सातत्याने धमक्या येत असून त्याच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला. अलीकडेच त्यांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. जर सलमान खानने काळवीट मारलं असेल तर त्याने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, असं लॉरेन्स बिश्नोई टोळीचं म्हणणं आहे. मात्र, सलमान खानचे वडील सलीम खान म्हणाले की, जर सलमानने कोणत्याही प्राण्याची हत्या केली नसेल तर माफी का मागायची. माफी मागणे म्हणजे सलमानने ती चूक मान्य केली आहे. तर सलमानने असं काहीही केलेलं नाही. आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितलं की, सलमानने काळवीट मारलं की नाही, हे बाजूला ठेवलं पाहिजे. सलमानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी. हा आता अहंकाराचा विषय राहिला नाही. एबीपीसोबत बोलताना सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने अनेक खुलासे केले आहेत. सलमाननेच काळवीट मारल्याचं तिने सांगितलं. सोमी अली म्हणाली की, त्यावेळी ती आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. पण बिश्नोई समाजात काळवीटाची पूजा केली जाते हे सलमान खानला माहित नव्हतं. बॉलिवूडमध्ये किंवा हॉलिवूडमध्ये कोणाचीही हत्या होऊ नये आणि हिंसा हा त्यावरचा उपाय नाही, असं सोमी अलीला वाटतं. त्याचबरोबर सोमी अलीला लॉरेन्स बिश्नोईसोबतसुद्धा काहीतरी बोलायचं असल्याचं तिने सांगितलं, जेणेकरून ती त्याची मानसिकता समजून घेईल आणि त्याला शांततेत प्रश्न विचारेल. नोव्हेंबरमध्ये अभिनेत्री भारतात येणार असून लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल, असंही तिने सांगितलं. दरम्यान, सलमान खान सध्या बिग बॉस १८ हा शो होस्ट करत असून या शोला दोन आठवडे झाले आहेत. अनूप जलोटा बिग बॉस १२ मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी ते चर्चेत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *