पार्थ जिंदाल आणि राहुल यांच्यात काय संवाद झाला?
आयपीएलच्या मेगा लिलावात केएल राहुलला विकत घेतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन खूप खूश आहे. लिलावानंतर संघ मालक पार्थ जिंदाल आणि केएल राहुल यांच्यातही चर्चा झाली. पार्थ जिंदालने ईएसपीएन क्रिकइन्फोशी केलेल्या संभाषणात सांगितले की, ‘केएल राहुलने १४ कोटी रुपयांव्यतिरिक्त संघाकडून सन्मानही मागितला आहे. राहुलला फक्त क्रिकेट खेळायचे आहे. त्याला फक्त फ्रँचायझीकडून प्रेम आणि समर्थन हवे आहे आणि दुसरे काहीही नाही. केएल संघात सन्मान हवा आहे आणि दिल्लीकडून तो मिळेल अशी आशा आहे. राहुलही दिल्लीसाठी आयपीएल खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आतुर आहे. पार्थ जिंदालशी संवाद साधताना राहुल म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सने कधीही आयपीएल जिंकले नाही आणि मीही जिंकले नाही, मग ते एकत्र का जिंकू नये.”
लखनौमध्ये राहुलसोबत गदारोळ झाला होता
लखनऊ सुपरजायंट्स संघात केएल राहुल आणि मालक संजीव गोयंका यांच्यात मोठा गदारोळ झाला होता. संजीव गोयंका यांनी राहुलला त्याच्या संथ फलंदाजीबद्दल जाहीरपणे खडसावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रिटेन्शनचा प्रश्न आला तेव्हा राहुलने कायम ठेवण्यास नकार दिला. त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्स संघाने केएल राहुलला लिलावात विकत घेतले असून तो संघाचे नेतृत्वही करेल अशी अपेक्षा आहे.