ylliX - Online Advertising Network
झोमॅटोवरुन शाहाकारी भाजी ऑर्डर केली, पण पार्सलमध्ये भलतंच निघालं; अन्न विभागाची मोठी कारवाई

झोमॅटोवरुन शाहाकारी भाजी ऑर्डर केली, पण पार्सलमध्ये भलतंच निघालं; अन्न विभागाची मोठी कारवाई



उज्जैन : फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या चुकीच्या ऑर्डर्सची अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी सतना येथील एका ब्राह्मण कुटुंबाला डॉमिनोजकडून नॉनव्हेज पिझ्झा डिलिव्हर्ड करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. उज्जैनमध्ये शाहाकारी ऑर्डर केल्यानंतर पार्सलमध्ये नॉनव्हेज आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यानंतर ग्राहकाने अन्न विभागाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर अन्न विभागाने चुकीचं पार्सल पाठवलेल्या हॉटेलचा परवाना रद्द केला आहे.फार्मास्युटिकल कंपनीच्या एमआर असलेल्या व्यक्तीसोबत ही घटना घडली. व्यक्ती कंपनीच्या कामानिमित्त उज्जैनला आले होते. इथे त्यांनी मंगळवारी जेवणासाठी झोमॅटोवरुन शेव टोमॅटो भाजी ऑर्डर केली होती. ही भाजी हॉटेल नसीब येथून ऑर्डर करण्यात आली होती.पार्सल आल्यानंतर ते जेवायला बसले त्यावेळी त्यांना भाजीत हाडाचे तुकडे दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती अन्न विभागाला दिली. अन्न विभागाच्या पथकाने तात्काळ हॉटेल नसीब येथे पोहोचून तपासणी केली. या तपासणीवेळी हॉटेलमधे गैरप्रकार दिसून आला. या हॉटेलच्या किचनमध्ये एकाच ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बनवलं जात असल्याचं समोर आलं.

जेवण बनवण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर

पोलिसांनी तसंच अन्न विभागाने केलेल्या तपासात हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचंही समोर आलं. अन्न विभागाच्या चौकशीमधे हॉटेल चालकानेही व्हेज जेवणात चुकून नॉनव्हेज मिसळलं गेलं असावं, अशी कबुली दिली आहे. याप्रकरणी अन्न विभागाच्या पथकाने कारवाई करत त्या हॉटेलचा परवाना रद्द केला असून त्यांचा व्यवसायही तातडीने बंद करण्यात आला आहे.दरम्यान, अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पोलीस स्टेशनमधून शाहाकारी भाजीमध्ये हाड मिळालं असल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ते हॉटेलवर पोहोचले असता अनेक गैरप्रकार आढळून आल्याचं ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *