ylliX - Online Advertising Network
अपक्ष उमेदवाराचा प्रताप वाचून डोक्याला हात लावण्याची वेळ; प्रसिद्धी आणि सहानुभूतीसाठी पाहा काय केले

अपक्ष उमेदवाराचा प्रताप वाचून डोक्याला हात लावण्याची वेळ; प्रसिद्धी आणि सहानुभूतीसाठी पाहा काय केले



नांदेड(अर्जुन राठोड): निवडणुकी काळात प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी उमेदवार कधी काय करेल याचा काही नेम असतो. असाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आहे. प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी एका अपक्ष उमेदवाराने स्वतःच चार चाकी वाहन जाळले आणि अज्ञात व्यक्तीने वाहन जाळल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याचा हा खोटा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी उमेदवारासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांचं समर्थन मिळण्यासाठी उमेदवाराने हा बनाव केल्याची चर्चा आहे. नांदेडमध्ये विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नऊ मतदान क्षेत्रात अनेकजण आपले भाग्य आजमावत आहेत. कंधार तालुक्यातील करतळा येथील परसराम कदम यांनी मुखेड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. २ नोव्हेंबर रोजी रात्री सवा सहा वाजेच्या सुमारास मुखेड ते बाऱ्हाळी रोड परसराम दत्ता कदम यांनी पुतण्या अक्षय लहू कदम याच्या मदतीने स्वतः जवळील असलेली टाटा सफारी वाहन क्रमांक ( एमएच २६ एल २७७५) डिझेल टाकून जाळली. त्यानंतर काका पुतण्याने मुखेड पोलिसांना फोन करून आमची गाडी अज्ञाताने जाळली अशी माहिती दिली. घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शिवाय अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवली. तपासा दरम्यान पोलिसांना मात्र संशय येतं होता. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पुतण्या अक्षय कदम याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्या दोघांचा बनाव उघडकीस आला. निवडणुकीत प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली काका पुतण्याने दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुखेड पोलिसांनी अपक्ष उमेदवार परसराम कदम आणि त्याचा पुतण्या अक्षय कदम या दोघा विरोधात कलम २८७, २१७, ३२४(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच समर्थन मिळावे यासाठी उमेदवाराने ही शक्कल लढवल्याची चर्चा आहे. प्रसिद्धीसाठी उमेदवारने अश्या प्रकारे कृत्य केल्याचे उघड झाल्याने मुखेड मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *