ylliX - Online Advertising Network
वडील राज ठाकरेंनाच ८४ लाखांचं कर्ज, दादरच्या स्टेट बँकेत १०७ खाती, अमित ठाकरेंची संपत्ती किती?

वडील राज ठाकरेंनाच ८४ लाखांचं कर्ज, दादरच्या स्टेट बँकेत १०७ खाती, अमित ठाकरेंची संपत्ती किती?



म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सोमवारी लक्षणीय ठरले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र . अमित हे मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. अमित यांच्याकडे एकूण १२.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर दादरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत १०७ खाती असून त्यात ५.९३ कोटी रुपये जमा आहेत.

अमित ठाकरेंची संपत्ती किती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे १२.५४ कोटी रुपयांची तर पत्नी मिताली यांच्याकडे १.७२ कोटी रुपयांची आणि पुत्र किआन याच्याकडे ६१.६७ लाख रुपयांची संपत्ती आहे.

स्टेट बँकेत १०७ खाती

अमित ठाकरे यांची दादरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत १०७ खाती असून त्यात ५.९३ कोटी रुपये जमा आहेत. अमित यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य १.२९ कोटी रुपये इतके आहे. त्यांचे २०२३-२४ वर्षाचे उत्पन्न ४९ लाख ८९ हजार, तर पत्नीचे उत्पन्न ४५ लाख १७ हजार इतके आहे.त्यांनी आपला व्यवसाय ऑपरेशनल आणि टेक्निकल एक्झिक्युटिव्ह असा नमूद केला आहे. वेलिंगकर इन्स्टिट्यूट, माटुंगा येथून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.

वडिलांना कर्ज

अमित यांच्यावर ४.१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. आई शर्मिला ठाकरे यांच्याकडून त्यातील ३.६५ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. तर बहीण उर्वशी ठाकरेंकडून २१ हजार, आजी मधुवंती ठाकरेंकडून १ लाख ६१ हजार, तर पत्नी मितालीकडून ४७.७१ लाखांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे.विशेष म्हणजे त्यांनी ८९ लाख रुपयांची कर्जे दिली असून त्यातील ८४ लाख रुपयांचे कर्ज वडील राज ठाकरे यांना दिले आहे. अमित यांच्या नावावर एकही गाडी नाही. तर, अमित ठाकरे यांच्यावर एकही गुन्हा नोंद नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *