मुंबई – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम असून कायम चर्चेत असतो. या कार्याक्रमाबरोबरच यामधील कलाकारसुद्धा चर्चेत असतात. अशातच फेम अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहेच पण त्याचबरोबर सर्वांनाच आश्चर्याचा धक्कासुद्धा दिलाय. लग्नबंधनात अडकला असून आज २५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याने गुपचूप लग्नगाठ बांधली. पृथ्वीकने त्याच्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना आणि अनेक कलाकारांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. लग्नाचे हे खास फोटो शेअर करत पृथ्वीकने, ‘२५-१०-२०२४…एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!’ असं कॅप्शन देत ‘जस्ट मॅरीड’ असं हॅशटॅग दिलं आहे.