ylliX - Online Advertising Network
'सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात माफी मागावी', भजनसम्राट अनुप जलोटांचा भाईजानला सल्ला

अमिताभ बच्चन यांच्या सासूच्या निधनाची बातमी खोटी, इंदिरा भादुरींचा पाठीचा कणा तुटल्याने रुग्णालयात दाखल



मुंबई – यांच्या आई यांच्या निधनाची बातमी खोटी आहे. अभिनेत्रीची आई सध्या रुग्णालयात दाखल आहे. इंदिरा भादुरी यांच्या पाठीचा कणा तुटला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जया बच्चन यांच्या आईचे निधन झाल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झालं आहे. जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या केअरटेकर एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना म्हणाली की, इंदिरा भादुरी पूर्णपणे निरोगी आहेत. केवळ त्यांच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आहे. इंदिरा भादुरी यांच्या केअरटेकरच्या म्हणण्यानुसार, त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्या आता आराम करत आहेत.

जया बच्चन यांची आई भोपाळमध्ये एकटीच राहते

जया बच्चन यांची आई आणि यांच्या सासू इंदिरा भादुरी या भोपाळच्या श्यामला हिल्स येथील अन्सल अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती तरुण भादुरी हे अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार होते. ते उत्तम लेखकही होते. तरुण भादुरी यांनी १९९६ मध्येच जगाचा निरोप घेतला. त्यानंतर इंदिरा भादुरी एकट्या राहत आहेत.

इंदिरा भादुरी यांच्यावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती

जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांच्यावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा भादुरी यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्यांच्यावर पेसमेकर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पेसमेकर शस्त्रक्रियेमध्ये, कॉलरबोनच्या अगदी खाली छातीत पेसमेकर लावला जातो आणि त्यात बॅटरी, सर्किटरी आणि एक ते तीन विद्युत तारा असतात. पेसमेकर हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवतो आणि हृदयाचे ठोके कमी झाल्यास त्याचा वेग वाढवतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *