ylliX - Online Advertising Network
ठाकरे म्हणाले, CM फेस जाहीर करा! पवारांनी चेहरा सांगितला; मविआत खळबळ, दोन राऊत बॅटिंगला

ठाकरे म्हणाले, CM फेस जाहीर करा! पवारांनी चेहरा सांगितला; मविआत खळबळ, दोन राऊत बॅटिंगला



मुंबई/सांगली: महाविकास आघाडीचा घोषित करा. जाहीर पाठिंबा देतो, अशी भूमिका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे सातत्यानं घेत आहेत. काल महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारला होता. यानंतर शरद पवारांनी सांगलीतील इस्लामपूरमधून भाषण करताना जयंत पाटलांनी महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी, असं सूचक विधान केलं. त्यामुळे पवारांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवल्याची चर्चा आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सातवेळा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही शरद पवारांसोबत राहिले. दिग्गज नेते साथ सोडून जाताना शर्थीनं किल्ला लढवला. लोकसभा निवडणुकीत गटाला १० पैकी ८ जागा मिळाल्या. काल इस्लामपुरातील जाहीर सभेत शरद पवारांनी जयंत पाटलांचं तोंड भरुन कौतुक केलं. महाराष्ट्राला पुढे नेण्याची शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, साखळ गावातून उद्या महाराष्ट्र घडवण्याची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र उभारण्याची, सावरण्याची आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या सुपुत्रावर मी टाकणार आहे, असं पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला. काँग्रेस, ठाकरेसेनेनं थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवात केली. पण यापासून शरद पवार चार हात लांब राहिले. पण आता त्यांनी थेट जयंत पाटील यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांची मुख्यमंत्रिपदाची पात्रता आहे, असं शरद पवारांनी म्हणण्यात काही वावगं नाही, असं काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतर संख्याबळानुसार घेण्यात येईल. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा किंवा मुख्यमंत्री ठरवणं राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या हाती नाही. त्याबद्दलचा निर्णय दिल्लीतून हायकमांड घेतील, असं राऊत यांनी म्हटलं. शरद पवारांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानावर शिवसेना उबाठाचे खासदार यांनीही प्रतिक्रिया दिली. पवार कधी कुठले संकेत देत नाहीत. त्यांनी काही संकेत दिले असतीत, तर त्याबद्दल चर्चा करु. मध्यंतरी त्यांनी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. मधल्या काळात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांच्या नावांचीही चर्चा होती. पाच-सहा जण कसे काय मुख्यमंत्री होऊ शकतात, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *