मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित गटात प्रवेश केलेल्या यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील बांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर ही घटना घडली आहे. या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर एक आरोपी आता फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची पथके रवाना केली आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या गोळीबार झालेली दुर्देवी घटना आहे. पोलिसांना प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गँगवार डोकं वर काढता कामा नये. तीन आरोंमधील दोघांना पकडले असून एक आरोपी हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशमधील आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बाबा सिद्दिकी यांना गोळीबारानंतर लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार हे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. बाबा सिद्दिकी यांची सुपारी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती. तिन्ही आरोपी पुण्यातून आले होते, मात्र यांना कोणी बोलावलं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामधील एका आरोपीचे नाव शिवा असं असून या हत्येमागे एक मोठा गँगस्टर असल्याचं माहिती समोर येत आहे. बिश्नोई गँगच्या अँगलने पोलील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करत आहेत.भायखळ्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची ४ ॲाक्टोबरच्या रात्री हत्या करण्यात आली होती. आठवड्याभरात अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाल्याने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ही चर्चेचा विषय बनली आहे. सिद्दीकी यांची हत्या पूर्व वैमनस्य आणि स्थानिक प्रश्नांवर मतभेदांवरून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, हल्लेखोर उत्तर भारतातील असल्याने यामागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचाही संशय असून याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची पथके तपास करीत आहेत.