ylliX - Online Advertising Network
गोविंदाच्या जावयावर पैशांचा पाऊस, IPL लिलावात मोठी बोली; राजस्थान रॉयल्सकडून कितीला खरेदी?

गोविंदाच्या जावयावर पैशांचा पाऊस, IPL लिलावात मोठी बोली; राजस्थान रॉयल्सकडून कितीला खरेदी?



मुंबई : सौदी अरेबिया येथील जेद्दामध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी मेगा ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये अर्थात लिलावात राजस्थान रॉयल्सच्या संघाने नीतिश राणा या खेळाडूला ४.२ कोटींमध्ये खरेदी केलं. उत्तर प्रदेशसाठी घरगुती क्रिकेट खेळणारा नीतिश राणाला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सनेही पूर्ण जोर लावला होता, पण राजस्थान रॉयल्सने बाजी मारत राणा याला आपल्या संघात घेतलं. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच्या आधीच्या फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणासाठी एकही बोली लावली नाही.नीतिश राणाने केकेआरचं नेतृत्व केलं आहे. श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीनंतर नितिश राणाने संघाची धुरा सांभाळली होती, पण दुर्दैवाने केकेआरने मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोली लावली नाही. आता राणा राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये खेळणार असून तो मधल्या फळीत फलंदाजी करणारा खेळाडू असून पार्ट टाइम स्पिनरही आहे.

नात्यात गोविंदाचा जावई आहे नीतिश राणा

बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा नीतिश राणा नात्याने जावई आहे. नीतिशने एका टीव्ही शोमध्ये याबाबत माहिती दिली होती. गोविंदा यांचा भाचा कृष्णा अभिषेकने सांगितलेलं, की नीतिश राणाची पत्नी सांची मारवाह कृष्णा अभिषेकची चुलत बहीण आहे. अशात नीतिश कृष्णा अभिषेकचा मेहुणा आहे. नीतिश राणा हा गोविंदाची भाची सांची मारवाहचा पती असल्याने तो गोविंदा यांचा जावई असल्याचं कृष्णा अभिषेकने म्हटलं होतं.

मुंबई इंडियन्समधून मिळालेली ओळख

नीतिश राणाने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. २०१७ च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संधी दिली होती. त्यावेळी मधल्या फळीत खेळत नीतिशने १२ डावात ३३३ धावा केल्या होत्या. यामध्ये अनेक मॅचविनिंग इनिंग्सचाही समावेश होता.IPL २०१८ च्या लिलावात KKR ने त्याला ३.४ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. २०२२ च्या लिलावात KKR ने त्याला विकत घेण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च केले, पण IPL २०२५ मध्ये KKR ने नितीश राणावर बोली लावली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *